-
कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सध्या चर्चेत आहे. लवकरच तो कपिल शर्मासोबत एका नवीन कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे. या दोघांनी नेटफ्लिक्स शोमध्ये एकत्र दिसणार असल्याची घोषणा केली होती, त्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्या शोची वाट पाहत आहेत.
-
या सगळ्यामध्ये नुकतीच सुनील ग्रोव्हरने त्याच्या घराची काही झलक दाखवली आहे. सुनील ग्रोव्हर मुंबईत एका आलिशान घरात राहतो, जे त्याने २०१३ मध्ये खरेदी केले होते.
-
त्यावेळी त्यांनी हे घर ३ कोटी रुपयांना विकत घेतले होते. सुनीलच्या घरातून मुंबईचे नयनरम्य दृश्य दिसते.
-
त्याच बरोबर त्यांच्या घरात जिन्यापासून ते बैठकीपर्यंत सर्व लाकडी फर्निचर बसवण्यात आले आहे ज्यामुळे त्यांच्या घराचा लूक अत्यंत वेगळा आहे.
-
घराची भिंती फुलांच्या हँड पेंटिंगने सजवल्या आहे. त्याच्या घरातील प्रत्येक वस्तू अतिशय व्यवस्थितपणे ठेवली आहे.
-
लिव्हिंग रूममध्ये त्यांनी दाराजवळ जेवणाचे टेबल आणि खुर्ची ठेवली आहे. सुनील ग्रोव्हरचा हा आवडता कोपरा आहे जिथे तो बसून जेवण करतो.
-
दिवाणखान्यातच (Living Room) एका कोपऱ्यात त्याने पियानो ठेवला आहे. यावरून सुनीललाही संगीताची आवड असल्याचे दिसून येते. त्याच्या घरात एक गेम कॉर्नर देखील आहे, जिथे तो त्याच्या मोकळ्या वेळेत आपल्या मुलासोबत खेळतो.
-
सुनीलच्या या घराच्या बाल्कनीतून माया नगरी मुंबई शहराचे सुंदर दृश्य दिसते. त्याने बाल्कनीत काही पलंग ठेवले आहेत आणि ते सुंदर वनस्पतींनी सजवले आहे. याशिवाय बाल्कनीत भगवान बुद्धांचा शोपीसही ठेवण्यात आला आहे.
-
किचनमध्ये एका मोठ्या फ्रीजसह त्याने सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवल्या आहेत. त्याच वेळी, कॉरिडॉरपासून डायनिंग टेबल आणि बाल्कनीपर्यंत सर्व काही त्याने नीटनेटके ठेवले आहे.
-
सुनीलने त्याच्या घरातील त्याची आवडती जागाही दाखवली आहे जिथे तो अनेकदा बसतो, पुस्तके वाचतो आणि विश्रांती घेतो. ( सर्व फोटो स्त्रोत: @whosunilgrover/instagram)

१०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला ६ दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा? लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धीत होणार वाढ!