-
व्हॉट्सअॅप ग्रूप हा मित्र व कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी चांगला पर्याय आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी व्हॉट्सअॅप ग्रूप वापरतात. (फोटो : @shwetabachchan/instagram)
-
. श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी एकदा ‘कॉफी विथ करण’मध्ये बच्चन कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपबद्दल खुलासा केला होता. (फोटो : @shwetabachchan/instagram)
-
श्वेताने सांगितलं होतं की, पापा (अमिताभ बच्चन) फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सर्वाधिक सक्रिय असतात आणि ते अनेकदा ग्रुपमध्ये सर्वांना विविध विषयावर माहिती देतात. (फोटो : @shwetabachchan/instagram)
-
पुढे, श्वेता म्हणाली की तिची वहिनी म्हणजेच अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्या राय ग्रुपमध्ये खूप कमी सक्रिय आहे आणि वेळेवर मेसेजला रिप्लाय देत नाही. (फोटो – @aishwaryaraiibachchan_arb/instagram)
-
यासोबतच श्वेता म्हणाली की तिची आई म्हणजेच जया बच्चन एखाद्या सामान्य आंटीप्रमाणे ग्रुपमध्ये नेहमी ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड नाईट’ मेसेज पाठवते. (फोटो स्रोत: @shwetabachchan/instagram)
-
त्याचवेळी अभिषेक बच्चन म्हणाला की, फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपचा अतिशय कडक नियम आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती कुठून तरी परत येते किंवा जाते तेव्हा त्याची माहिती ग्रुपमध्ये द्यावी लागते. (फोटो : @shwetabachchan/instagram)
-
तर अभिषेक बच्चन म्हणाला की जर एखादी व्यक्ती फ्लाइट घेत असेल तर त्याला टेक ऑफ आणि लँडिंगची वेळ ग्रुपमध्ये शेअर करावी लागते. (फोटो : @shwetabachchan/instagram)
-
जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांच्याशिवाय श्वेताची मुलंही या ग्रुपमध्ये सामील असल्याचे श्वेता बच्चनने सांगितले. (फोटो @shwetabachchan/instagram)
-
अभिषेक बच्चन म्हणाला की, आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सर्वात छान व्यक्ती म्हणजे त्याचा भाचा अगस्त्य आहे. तो अनेकदा ग्रुपमध्ये मीम्स आणि जोक्स शेअर करतो आणि सर्वांचे मनोरंजन करतो. (फोटो @shwetabachchan/instagram)

१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य