-
अभिनेता शशांक केतकर सध्या ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
‘मुरांबा’ मालिकेत शशांकने साकारलेला अक्षय मुकादम आता घराघरात पोहोचला आहे.
-
शशांकची ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून टीआरपीच्या यादीत देखील चांगल्या स्थानावर आहे.
-
‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांप्रमाणे शशांकची ‘मुरांबा’ मालिका देखील लोकप्रिय ठरली आहे.
-
अलीकडेच शशांकने ‘अल्ट्रा मराठी बझ’ एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी लाडका लेक ऋग्वेदसाठी आलेल्या जाहिराती का नाकारल्या? याविषयी शशांक स्पष्टच बोलला.
-
अभिनेता शशांक केतकर म्हणाला, “मी ऋग्वेदसाठी आलेल्या अनेक जाहिरातींना नकार दिला. तेलाच्या, पावडरच्या, पुस्तकांच्या, डायपरच्या अशा जाहिराती आल्या होत्या. पण आम्ही नाही म्हणालो.”
-
“कारण ती लहान मुलं कपडे न घातलेलं दाखवायचं आणि त्याच्यातून आम्ही पैसे कमावयाचे, ही भावना आम्हाला काही पटली नाही. हा आमचा विचार आहे,” असं शशांक म्हणाला.
-
पुढे शशांक म्हणाला, “तो खूप मोठा झाला, त्याला कळायला लागलं तर तो लोकांसमोर येईलचं.”
-
दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो मराठी चित्रपटांमध्येही झळकला होता.
-
तसंच आता तो हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय झाला आहे.
-
हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजमध्ये शशांक झळकला होता.
-
लवकरच शशांक बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई