-
भारतातील चित्रपट उद्योग हा खूप मोठा आणि यशस्वी उद्योग आहे. या इंडस्ट्रीत अनेक कुटुंबे आहेत जी अनेक पिढ्यांपासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. या कुटुंबांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक सुपरस्टार दिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट परिवार कोण आहे? भारतातील चित्रपट उद्योग हा खूप मोठा आणि यशस्वी उद्योग आहे. या इंडस्ट्रीत अनेक कुटुंबे आहेत जी अनेक पिढ्यांपासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. या कुटुंबांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक सुपरस्टार दिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट परिवार कोण आहे? (फोटो : राम चरण/इन्स्टाग्राम)
-
भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट कुटुंब म्हणजे अल्लू-कोनिडेला कुटुंब ज्याला मेगा फॅमिली म्हणूनही ओळखले जाते. चित्रपट उद्योगात प्रवेश करणारी या कुटुंबातील पहिली व्यक्ती अल्लू रामलिंगय्या, तेलगू चित्रपटातील सर्वात लोकप्रिय अभिनेते आणि चित्रपट निर्माते होते. (फोटो : अल्लू अर्जुन/इन्स्टाग्राम)
-
अल्लू रामलिंगय्या यांनी १९५० साली ‘पुट्टीलू’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी १००० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना १९९० मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. (फोटो : अल्लू अर्जुन/इन्स्टाग्राम)
-
अल्लू-कोनिडेला कुटुंबाच्या किमान तीन पिढ्या चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. अल्लू रामलिंगय्या यांच्या चार मुलांपैकी अल्लू अरविंद हे चित्रपट निर्माते झाले. अल्लू अरविंद यांचा मुलगा अल्लू अर्जुन याने आपल्या अभिनयाने दक्षिण तसेच उत्तर भारतातील लोकांची मने जिंकली. (फोटो : अल्लू अर्जुन/इन्स्टाग्राम)
-
अल्लू रामलिंगय्या यांची मुलगी सुरेखा हिने अभिनेता चिरंजीवी यांच्याशी लग्न केले, जे नंतर केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार बनले. (फोटो : चिरंजीवी कोनिडेला/इन्स्टाग्राम
-
चिरंजीवींचा मुलगा राम चरण यानेही वडिलांप्रमाणेच दक्षिण चित्रपटसृष्टीत यश संपादन केले आणि सुपरस्टार बनला. (फोटो – अल्लू अर्जुन)
-
चिरंजीवीचे भाऊ पवन कल्याण आणि नागेंद्र बाबू हे देखील मोठे अभिनेते आहेत. नागेंद्र बाबू यांचा मुलगा वरुण तेज हा देखील अभिनेता आहे. चिरंजीवीची बहीण विजया दुर्गा हिचा मुलगा साई धरम तेज देखील चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. (फोटो : राम चरण/इन्स्टाग्राम)
-
मेगा कुटुंबाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर, सर्व सदस्यांची मिळून एकूण मालमत्ता ६००० कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या कुटुंबातील सर्वात श्रीमंत सदस्य चिरंजीवी आणि राम चरण आहेत. (फोटो : राम चरण/इन्स्टाग्राम)
-
एकट्या चिरंजीवींची एकूण संपत्ती १६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर राम चरण याच्याकडे १३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. (फोटो – अल्लू अर्जुन)
-
या कुटुंबाच्या स्वतःच्या ५ चित्रपट निर्मिती कंपन्या आहेत. ज्यात गीता आर्ट्स, अंजना प्रॉडक्शन, पवन कल्याण क्रिएटिव्ह वर्क्स, कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी, अल्लू स्टुडिओ यांचा समावेश आहे. (फोटो स्त्रोत: अल्लू अर्जुन/इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स