-
Kase Visru Song: मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत, असाच एक धाडसी प्रयोग रिव्हर्स मोशनमध्ये उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे प्रणिल आर्ट्स निर्मित ‘कसे विसरू’ हे गाणं.
-
अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? हे व्यक्त करणारी आजवर कधीही न पाहिलेली ‘सरळ चालणाऱ्या नाजूक नात्याची ही उलटी गोष्ट…’ म्हणजेच ‘कसे विसरु’?
-
‘दादर अभिमान गीता’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा हा तिसरा व्हिडिओ असून या अनोख्या प्रयोगाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
गाण्याची पटकथा, दिग्दर्शन, मांडणी ही प्रणिल हातिसकरने केली आहे.
-
तसेच प्रख्यात गायक केवल वाळंज ह्यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे.
-
या गाण्यातून आपल्या सर्वांची लाडकी ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता वालावलकर व सध्याचा मराठी मालिकांमधील आघाडीचा अभिनेता विवेक सांगळे अशी नवीन जोडी आपल्या भेटीला आली असून ही दोघांची जोडी फार सुरेख दिसत असून त्यांचा अभिनय सुद्धा साजेसा झालेला आहे.
-
एखादी गोष्ट सरळ दाखवणं हे रिव्हर्स मोशनच्या तुलनेत बऱ्यापैकी सोप्पं आहे, कारण जेव्हा तुम्ही गोष्ट उलटी उलगडत आपण नेतो त्यावेळेस कलाकारांचे हावभाव सुद्धा बदलतात.
-
ही गोष्ट फार बारकाईने करावी लागते आणि तेच बारकावे अत्यंत सुरेख पद्धतीने हाताळून प्रणिल हातिसकर ह्यांनी ‘कसे विसरू’ ह्या गाण्याची रिव्हर्स मोशनमध्ये निर्मिती केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विवेक सांगळे आणि अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…