-
स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सुरु आहे मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम.
-
सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
हो – नाही म्हणता म्हणता, मुक्ता सागर अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
दोन्ही कुटुंबाची मतं, रितीरिवाज वेगवेगळे असले तरी या दोन्ही कुटुंबांना जोडणारा दुवा म्हणजे सई.
-
सईवरच्या याच प्रेमापोटी फक्त सागर आणि मुक्ता नाही तर गोखले आणि कोळी परिवार एकत्र येणार आहे.
-
आता कोळी म्हण्टलं आणि हळदीला धुमशान झालं नाही तर नवल.
-
सागरच्या हळदीसाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबाने जय्यत तयारी केली आहे.
-
एरव्ही मॉडर्न अंदाजात दिसणारा सागर हळदीसाठी पारंपरिक कोळी वेशात दिसणार आहे.
-
खास बात म्हणजे हळदी कार्यक्रमासाठी गायक दादूस हजेरी लावणार आहे.
-
हळदी कार्यक्रमात दादूस कोळी गाणी गाऊन धमाल करणार आहे.
-
दादूसच्या धमाकेदार कोळी गाण्यांवर संपूर्ण परिवार ठेका धरणार आहे.
-
तिकडे मुक्ताच्या हळदीसाठीही संपूर्ण गोखले कुटुंब एकत्र येणार आहे.
-
मुक्ताला आशीर्वाद देण्यासाठी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कलाची आई म्हणजेच संगीता देखिल खास हजेरी लावणार आहे.
-
त्यामुळे मुक्ता-सागरच्या हळदीची रंगत द्विगुणीत होणार हे मात्र नक्की.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…