-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपल्या पतीसह दुबईमध्ये आहे. मात्र, दुबईमध्ये असतानाही सोनाली आपली संस्कृती आणि संस्कार विसरलेली नाही.
-
सोनाली आपल्या पतीसह त्यांच्या दुबईच्या घरात सर्व भारतीय सण तितक्याच उत्साहाने साजरे करतेय.
-
हे आनंदाचे क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करण्यात सोनाली अजिबात मागे राहत नाही.
-
सोशल मीडियावर सोनाली आपल्या आयुष्याबाबत अनेक अपडेट चाहत्यांना देत असते.
-
नुकतंच सोनालीने जांभळ्या धूपछाव पैठणी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
सोनालीने या फोटोना ‘बिंग वेरी मच इंडियन इन दुबई’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
यावेळी सोनालीने कोणतेही दागिने घातलेले नाहीत. तिने केस मोकळे सोडून अतिशय सिंपल लूक केला आहे.
-
दरम्यान, एका चाहत्याने सोनालीच्या फोटोंवर भन्नाट कमेंट केली आहे. त्याने म्हटलंय, “काहीही कर, पण नवऱ्याला घेऊन बिगबॉसमध्ये जाऊ नको”
-
सध्या ‘बिगबॉस १७’मध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन स्पर्धक म्हणून राहत आहेत.
-
बिगबॉसमधील परिस्थितीचा त्यांच्या नात्यावरही परिणाम होतोय. त्याच पार्श्वभूमीवर चाहत्याने सोनालीला हा सल्ला दिला असावा. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम. छायाचित्रकार – @yashkaklotar)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार