-
बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या आलिशान बंगला ‘प्रतीक्षा’ त्यांची लाडकी मुलगी श्वेता बच्चन हिच्या नावावर केला आहे.
-
अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन आता आपल्या संपत्तीची वाटणी करणार असल्याच्या चर्चा होत आहेत.
-
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबद्दल बोलायचे झाले तर तो मुंबईतील जुहू भागात आहे. या भव्य बंगल्याची किंमत १४० कोटी रुपये आहे.
-
अमिताभ बच्चन यांचे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.
-
मिळालेल्या माहितीनुसार, ‘चुपके चुपके’, ‘आनंद’, ‘सत्ते पे सत्ता’ आणि ‘नमक हराम’ या सुपरहिट चित्रपटांचे शूटिंगही या बंगल्यात झाले आहे.
-
‘चुपके चुपके’ या चित्रपटात ‘जलसा’ बंगला दाखवण्यात आला आहे.
-
या जलसामध्ये अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतात.
-
बिग बींचे ऑफिस जनक नावाच्या दुसऱ्या बंगल्यात आहे. जिथून त्यांची सर्व व्यावसायिक कामं केली जातात.
-
अमिताभ बच्चन यांनी जलसा बंगला दोनदा खरेदी केला होता. बिग बींनी निर्माता एनसी सिप्पी यांच्याकडून हा बंगला विकत घेतला होता. पण काही कारणास्तव अमिताभ बच्चन यांनी हा बंगला दुसऱ्याला विकला.
-
कर्जबाजारी झाल्याने त्यांनी बंगला विकल्याचं म्हटलं जातं. पण नंतर परिस्थिती सुधारल्यावर त्यांनी लगेचच हा बंगला पुन्हा विकत घेतला आणि त्याचे नूतनीकरण केले.
-
कोट्यवधींच्या तीन बंगल्यांसह अमिताभ बच्चन यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे.
-
त्यांच्याजवळ बेंटले, रोल्स रॉयस, ऑडीसह अनेक गाड्या आहेत. बेंटले कॉन्टिनेंटल जीटीची किंमत ३.२९ ते ४.४ कोटी, Rolls Royce Phantom ची किंमत ८.९९ कोटी, Lexus LX570 ची किंमत २.३२ कोटी आणि Audi A8L ची किंमत १.६४ ते १.९४ कोटी आहे.
-
जस्ट डायलमध्ये बच्चन यांची १० टक्के भागीदारी आहे आणि क्लाउड कम्युटिंग कंपनी स्टॅम्पेड कॅपिटलमध्ये त्यांची ३.४ टक्के भागीदारी आहे.
-
अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ३,३०० कोटी रुपये आहे.
-
(सर्व फोटो – अमिताभ बच्चन व श्वेता बच्चन यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख