-
गुगलच्या यादीत ‘जवान’ पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये या चित्रपटाला सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.
-
सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर 2′ हा गुगलवर वर्षातील दुसरा सर्वाधिक सर्च केलेला चित्रपट आहे. गदर 2’ हा 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर एक प्रेम कथा’चा सीक्वल होता.
-
‘जवान’ आणि ‘गदर 2’ नंतर हॉलिवूड चित्रपटाने यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या दोन चित्रपटांनंतर ‘ओपनहायमर’ हा चित्रपट गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला.
-
या यादीत ‘आदिपुरुष’ चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे. रामायणावर आधारित हा चित्रपट त्याच्या वादग्रस्त संवादांमुळे चर्चेत आला होता.
-
शाहरुख खानचा पठाण’ चित्रपट या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
-
अभिनेत्री अदा शर्माचा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट सहाव्या क्रमांकावर आहे. धर्मांतराच्या मुद्द्यावर बनलेला हा चित्रपटही वादात सापडला होता.
-
सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या अॅक्शनने भरलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. यावर्षी सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश झाला आहे.
-
थलपथी विजय वत्रिशा कृष्णन यांची भूमिका असलेल्या लिओ चित्रपट चांगलाच गाजला. गुगलच्या यादीत लिओ आठव्या क्रमांकावर आहे.
-
सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. गुगलच्या यादीत हा चित्रपट नवव्या क्रमांकावर आहे.
-
साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा सुपरहिट चित्रपट ‘वारीसू’चा या यादीत १० वा क्रमांक लागतो . बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”