-
बॉलीवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका, तृप्ती डिमरी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
-
‘अॅनिमल’ चित्रपटातील मुख्य कलाकारांप्रमाणे सध्या अभिनेते उपेंद्र लिमये यांनी साकारलेल्या फ्रेडी पाटील भूमिकेची सर्वत्र चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
-
उपेंद्र यांच्या एन्ट्रीला सिनेमागृहात एक वेगळाच माहोल तयार होतो. सगळीकडे त्यांनी साकालेल्या फ्रेडी पाटील या भूमिकेचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
-
परंतु, तुम्हाला माहिती आहे का? देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘अॅनिमल’ चित्रपटातील भूमिकेसाठी उपेंद्र लिमयेंनी सुरूवातीला नकार कळवला होता.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
-
‘अॅनिमल’ चित्रपटासाठी संदीप रेड्डी वांगाच्या सहायकाने सर्वप्रथम उपेंद्र लिमयेंना संपर्क केला होता.
-
परंतु, फक्त एका १० मिनिटांच्या सीनसाठी वेळ काढणं शक्य नाही म्हणून उपेंद्र लिमयेंनी या भूमिकेसाठी नकार कळवला होता.
-
शेवटी संदीपने अभिनेत्याला स्वत:हून फोन केला पण, त्यावेळी त्यांच्या फोनला रेंज नव्हती. त्यानंतर ‘अॅनिमल’ टीमने मेसेज करुन भेटायला तरी या असा निरोप लिमयेंना दिला होता.
-
उपेंद्र लिमये याबद्दल म्हणाले, “अर्जुन रेड्डीमुळे मी संदीपचं काम पाहिलं होतं. तो एक उत्तम दिग्दर्शक आहे त्यामुळे अशा माणसाला एकदा भेटायला काय हरकत आहे असा विचार मी केला.”
-
“त्याने डोक्यात लहान-लहान गोष्टींची तयारी करुन ठेवली होती. माझे गुगलवरुन फोटो काढून माझा लूक काय असेल हे सुद्धा त्याने आधीच ठरवलं होतं. एका सीनसाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. त्याने माझं यापूर्वीचं काम पाहिलेलं होतं.” असं उपेंद्र यांनी सांगितलं.
-
‘तू नाही म्हणू नकोस…फक्त ही भूमिका कर’ असा हट्ट संदीप रेड्डी वांगाने लिमयेंजवळ धरला होता.
-
“तू काम केलंस तर मला खूप आवडेल असं संदीपने मला सांगितलं अन् शेवटी मग सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मी चित्रपटासाठी होकार कळवला.” असा किस्सा उपेंद्र लिमयेंनी सांगितला.
-
चित्रपटासाठी होकार कळवल्यावर उपेंद्र यांनी ठरलेल्या शेड्युलप्रमाणे संपूर्ण शूटिंग पूर्ण केलं.
-
दरम्यान, ‘अॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत तब्बल ७०० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : संदीप रेड्डी वांगा व टीम ‘अॅनिमल’ इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”