-
अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीने साकारलेली मुक्ता आणि राजने साकारलेला सागर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
-
सध्या मालिकेत मुक्ता-सागरचा लग्नसोहळा सुरू आहे. त्यामुळे मालिका अधिकच चर्चेत आली आहे.
-
अशातच मुक्ता म्हणजे तेजश्रीने मालिकेच्या सेटवर ती राज हंचनाळेला का ओरडते? यामागच्या कारणाचा खुलासा केला.
-
अभिनेता राज हंचनाळे एका एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हणाला होता की, जशी ऑनस्क्रीन मुक्ता मला ओरडत असते, तशीच ऑफस्क्रीन तेजश्री देखील ओरडत असते.
-
त्यानंतर तेजश्रीने राजला ती सेटवर का ओरडत असते, याविषयी सांगितलं.
-
‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना तेजश्री म्हणाली, “मी भाषेच्या बाबतीत खूप शिस्तबद्ध असते. आपला सहकलाकार जास्तीत जास्त स्क्रीनवर छान वाटावा यासाठी मी ओरडत असते.”
-
“न आणि ण, फ आणि प, क आणि ख अशा पद्धतीच्या अक्षरांमध्ये कधीतरी कन्फूज होतं. ते नीट ऐकू आलं पाहिजे, यासाठी मी आग्रही असते. म्हणून मी त्याला (राज हंचनाळे) परत बोल, हे चुकलंय, परत बोल अशी ओरडत असते,” असं तेजश्रीने स्पष्टचं सांगितलं.
-
पुढे तेजश्री म्हणाली, “याशिवाय मस्ती मस्तीमध्ये राजला खूप उशीरा विनोद कळतात. राज हसायला लागल्यावर कळायला लागतं की, त्याला दोन तासांपूर्वीचा विनोद कळलाय आणि त्यावर तो आता हसतोय. त्यामुळे त्याला मी तू खूप स्लो आहेस का? अशी देखील ओरडत असते,”

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”