-
‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
मुक्ता-सागरचा लग्नसोहळा सुरू झाल्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका चर्चेत आली आहे.
-
सईच्या प्रेमाखातर मुक्ता-सागर लग्नाला तयार झाले आहेत. त्यामुळे गोखले-कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
-
काही दिवसांपूर्वीच मुक्ता-सागरचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला.
-
सध्या मुक्ता-सागरचा मेहंदी समारंभ सुरू आहे. लवकरच संगीताचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
-
मुक्ता-सागरच्या संगीतला ‘स्टार प्रवाह’च्या परिवारातील खास पाहुणे हजेरी लावणार असून डान्स करणार आहेत.
-
मुक्ताच्या आईने सांगितल्याप्रमाणे संगीत समारंभात फक्त शास्त्रीय नृत्य नसून कोळी गाण्यांवर डान्स पाहायला मिळणार आहे.
-
‘अबोली’मालिकेतील अबोली आणि ‘लग्नाची बेडी’मधील मधुराणी शास्त्रीय नृत्य करणार आहेत.
-
‘पिंकीचा विजय असो’मधील पिंकी-युवराज ‘करुया फुल्ल टू धिंगाणा’ या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत.
-
तसेच ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी-सार्थकचा सुद्धा डान्स पाहायला मिळणार आहे.
-
‘माझ्या दिलाचो’ या गाण्यावर आनंदी-सार्थक डान्स करणार आहेत.
-
शिवाय सई आणि कोळी कुटुंबातील सदस्य देखील वेगवेगळ्या गाण्यावर डान्स करणार आहेत. विशेष म्हणजे मुक्ता-सागर सुद्धा एकत्र डान्स करणार आहेत. ‘नवरी नी नवऱ्याची’ स्वारी या गाण्यावर दोघांचा डान्स पाहायला मिळणार आहे.
जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”