-
अभिनेत्री पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच साखरपुड्याची घोषणा केली.
-
पूजाने इन्स्टाग्रामवर जोडीदाराबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
-
तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो.
-
अभिनेत्रीचा होणारा नवरा कलाविश्वात कार्यरत नाही त्यामुळे या दोघांचं लग्न नेमकं जुळलं कसं? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने तिचा होणारा नवरा आणि लव्हस्टोरीविषयी सांगितलं आहे.
-
पूजा तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना म्हणाली, “माझी प्रेमकहाणी खूपच वेगळी आहे. मला वाटलं नव्हतं एवढ्या पटकन गोष्टी जुळून येतील. आम्ही दोघंही अरेंज मॅरेज पद्धतीत पहिल्यांदा भेटलो. त्याचं स्थळ माझ्यासाठी आईच्या मैत्रिणीने आणलं होतं.”
-
“पहिल्यांदा मी जेव्हा त्याचा फोटो पाहिला तेव्हाच मला तो आवडला होता. माझ्या आईच्या सांगण्यावरून मी त्याला सर्वात आधी फोन केला. त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं.” असं पूजाने सांगितलं.
-
पूजा व सिद्धेश एकमेकांशी बोलू लागल्यावर दोघांनीही बराच वेळ घेतला, आधी त्यांच्यात मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
याबद्दल पूजा म्हणाली, “सिद्धेशची बोलू लागल्यावर एक असा दिवस आला जेव्हा मला मनापासून वाटलं याच मुलाशी आपण लग्न केलं पाहिजे. अशी आमची साधी सुंदर लव्हस्टोरी आहे.”
-
“सुरुवातीला मी हे नातं सर्वांपासून गुपित ठेवलं होतं. त्यानंतर सगळ्यात आधी मी माझ्या लग्नाबद्दल गश्मीर महाजनीच्या बायकोला म्हणजेच गौरीला सांगितलं.” असा खुलासा पूजाने केला.
-
पुढच्या वर्षी पूजा व सिद्धेश लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
दरम्यान, पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच पूजा ‘मुसाफिरा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”