-
Dawood Ibrahim Poisoned: मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊद इब्राहिमला कराचीमध्ये विषबाधा झाल्याची बातमी आहे. तो रुग्णालयात असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
-
दाऊद इब्राहिम वर्षानुवर्षे पाकिस्तानात बसून भारताविरोधात कारवाया करतो. पाकिस्तानातील आयएसआयशी त्याचे चांगले संबंध आहेतच, पण तिथल्या चित्रपट अभिनेत्रींसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं होतं.
-
२०२० मध्ये, सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की दाऊद इब्राहिम त्याच्यापेक्षा २९ वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री आणि मॉडेल मेहविश हयातबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, अशा चर्चा झाल्या होत्या.
-
२०१९मध्ये जेव्हा मेहविश हयातला पाकिस्तानचा प्रतिष्ठित नागरी सन्मान तमगा-ए-इम्तियाज देण्यात आला तेव्हा या गोष्टीची खूप चर्चा झाली होती. चला जाणून घेऊया कोण आहे मेहविश हयात.
-
मेहविश हयात एक पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका आहे. मेहविश सुरुवातीला चित्रपटांमध्ये आयटम नंबर करत असे.
-
चित्रपटांमध्ये काम करत असताना ती दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आली. दाऊदच्या प्रभावामुळे तिला मोठ्या चित्रपटांमध्ये काम मिळू लागले.
-
दाऊदशिवाय मेहविशचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही चांगले संबंध आहेत.
-
मेहविशचे पाकिस्तानातील अनेक प्रभावशाली राजकारणी आणि उद्योगपतींशीही चांगले संबंध आहेत.
-
तमगा-ए-इम्तियाजने सन्मानित केल्यानंतर, दाऊदसह अनेक बलाढ्य लोकांच्या संपर्कात असल्यामुळेच तिला हा सन्मान मिळाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
-
मेहविश तिचा जास्तीत जास्त वेळ दाऊदबरोबर घालवते, असंही म्हटलं जातं.
-
मेहविश हयातने प्रियांका चोप्राचा पती निक जोनाससोबतचा एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता, या फोटोचीही खूप चर्चा झाली होती.
-
(सर्व फोटोः सोशल मीडिया)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य