-
अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
-
गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक ज्या क्षणांची वाट पाहत होते, तो क्षण मालिकेत सध्या पाहायला मिळत आहे.
-
लवकरच मुक्ता-सागर लग्नबंधनात अडकणार असून यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
-
मुक्ता-सागरचा साखरपुडा, मेहंदीचा सोहळा झाला आहे.
-
सध्या संगीत सोहळा सुरू असून या सोहळ्यासाठी खास स्टार प्रवाहच्या परिवातील सदस्यांनी हजेरी लावली आहे.
-
संगीत सोहळ्यानंतर हळद, सप्तपदी असं बरंच काही पाहायला मिळणार आहे.
-
या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळी सध्या विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहे.
-
अलीकडेच अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने राजमधील एक सवयी सांगत त्याला सल्ला दिला.
-
तेजश्री म्हणाली, “त्याचा फोन त्याने नियमित पाहावा. मला हा सल्ला त्याला द्यायला आवडेल.”
-
“कारण त्याची बायको माझी गोड मैत्रीण आहे. ती माझ्या फोनवर कॉल करते आणि म्हणते, ऐकना प्लीज माझ्या नवऱ्याला सांग फोन चेक कर. मी गेले तीन तास त्याला फोन करतेय. त्यामुळे मला त्याला हा सल्ला द्यायला आवडेल,” असं तेजश्री म्हणाली.
-
पुढे तेजश्रीने सांगितलं की, “त्याचा फोन मेकअप रुम किंवा मेकअप दादाच्या खिशात असतो. बायको तुला कॉल करते चेक कर असं म्हणावं, तेव्हा त्याचा फोन कुठेतरी पडलेला असतो. त्यामुळे मला जाहीरपणे त्याला सांगायला आवडेल, फोन वापर.”
-
दरम्यान, तेजश्री आणि राजची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तेजश्रीने साकारलेली मुक्ता आणि राजने साकारलेला सागर या दोघांनी प्रेक्षकांना मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”