-
मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर ६ डिसेंबर रोजी पियुष रानडेबरोबर लग्न बंधनात अडकली.
-
सुरुची आणि पियुष यांच्या लग्नाला त्यांचे जवळचे नातेवाईक आणि काही मोजकेच कलाकार उपस्थित होते.
-
सुरुची आणि पियुषच्या लग्नातील फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती.
-
लग्नानंतर सुरुचीने मोरपंखी रंगाच्या नऊवारी साडीत खास फोटोशूट केले आहे.
-
मोरपंखी रंगाच्या नऊवारी साडीवर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘Love & Peace’ असे कॅप्शन सुरुचीने नऊवारी साडीतील फोटोंना दिले आहे.
-
सुरुचीच्या या फोटोंवर अभिनेत्री अर्चना निपाणकरने ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
सुरुची सध्या ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत काम करत आहे.
-
झी मराठीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुरुची घराघरात लोकप्रिय झाली.
-
पियुष सध्या ‘काव्यांजली – सखी सावली’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…