-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘बिग बॉस 17’ मध्ये दिसत आहे. ३९ वर्षीय अभिनेत्रीने तिचा पती विकी जैनसह शोमध्ये सहभाग घेतला आहे.
-
या शोमध्ये अंकिता लोखंडेला चाहते खूप पसंत करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अंकिता बॅडमिंटन खेळाडू होती.
-
‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही शोमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अंकिता तिच्या कॉलेजमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू होती. तिने या खेळात अनेक पदकंही जिंकली आहेत.
-
२००६ मध्ये झालेल्या ‘आयडिया झी सिनेस्टार’ या टॅलेंट हंट रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊन अंकिता मनोरंजन क्षेत्राकडे वळली.
-
इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अंकिताने तिचे नाव बदलले होते. अंकिता हे तिचं खरं नाव नसून तिचं नाव तनुजा लोखंडे आहे. ज्योतिषाच्या सांगण्यावरून तिने नाव बदललं होतं.
-
२००९ मध्ये अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ही मालिका खूप हिट झाली आणि ती रातोरात स्टार बनली.
-
या शोनंतर अभिनेत्री ‘झलक दिखला जा ४’, ‘कॉमेडी सर्कस नया दौर’, ‘स्मार्ट जोडी’मध्ये स्पर्धक म्हणून दिसली.
-
‘एक थी नायिका’ या टीव्ही शोमध्येही ती दिसली होती. टीव्ही शो व्यतिरिक्त, अभिनेत्री काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये झळकली.
-
२०१९ मध्ये अंकिताने ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर ती ‘बागी ३’ आणि ‘द लास्ट कॉफी’ या चित्रपटातही दिसली.
-
लवकरच ती ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातही दिसणार आहे.
-
अंकिताच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं झाल्यास तिला पहिलं प्रेम टीव्ही शो ‘पवित्र रिश्ता’ दरम्यान भेटलं. ती दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती.
-
मात्र नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर अंकिता व बिझनेसमन विकी जैन डेट करू लागले. २०२१ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. (फोटो स्त्रोत: @lokhandeankita/instagram)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”