-
बॉलीवूड चित्रपट ‘चल भाग’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री चित्रा शुक्ला हिने लग्नगाठ बांधली आहे.
-
चित्राने भारतीय वन अधिकारी (IFS) वैभव उपाध्यायशी लग्न केले आहे.
-
लग्नानंतर चित्रा आणि वैभवने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
तिच्या लग्नात चित्राने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता.
-
यासह अभिनेत्रीने दागिने आणि ग्लॅम मेकअपने तिचा लूक पूर्ण केला.
-
तर, वैभवने पांढऱ्या रंगाची बंद गळ्याची शेरवानी या खास दिवसासाठी निवडली.
-
या फोटोंमध्ये चित्रा व वैभव खूप सुंदर दिसत आहेत.
-
या जोडप्याने डेस्टिनेशन वेडिंग न करता निसर्गाच्या सानिध्यात मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
दोघांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात सात फेरे घेतले.
-
त्रियुगीनारायण मंदिरात शतकानुशतके आग जळत आहे. माता पार्वती आणि भगवान शिव यांनी या अग्नीला साक्षी मानत विवाह केला होता, असं म्हणतात.
-
शिव आणि पार्वतीच्या विवाहात भगवान विष्णू यांनी पार्वतीचे भाऊ म्हणून सर्व विधी केले होते. तर या विवाहात ब्रह्मदेव पुरोहित होते, असं म्हटलं जातं.
-
चित्रा शुक्लाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची तेलुगू चित्रपट ‘हंट’मध्ये दिसली होती. लवकरच ती ‘ना ना’ या तमिळ चित्रपटात दिसणार आहे.
(फोटो स्त्रोत: @chitrashuklaofficial/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”