-
रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे.
-
आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ७०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
-
चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओलच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.
-
या चित्रपटातील बरीच गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बॉबी देओलच्या एन्ट्रीचं ‘जमाल जमालो कुडू’ हे गाणं विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
सोशल मीडियावर तर रील्समध्ये दर दोन व्हिडीओज मागे एक व्हिडीओ याच गाण्यावर बनवलेला पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या सेलिब्रिटीजनी सुद्धा या गाण्यावर रील पोस्ट केली आहेत.
-
हे एक जुनं इराणी गाणं ‘जमाल-जमालू’ म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे जे या चित्रपटात संदीप यांनी वापरलं आहे. याचबरोबरच चित्रपटात जेव्हा हे गाणं समोर येतं तेव्हा बॉबी देओल नाचताना दिसतो अन् मागे काही लहान मुलं आणि सुंदर मुलगी हे गाणं गाताना आपल्याला पाहायला मिळतं.
-
या सुंदर मुलीचं नाव आहे तन्नाज दावूदी आहे.
-
तन्नाज एक इराणी मॉडेल आहे अन् या गाण्यामुळे तीसुद्धा चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
-
‘अॅनिमल’मधूनच तन्नाजला खरी ओळख मिळाली.
-
याआधीसुद्धा बऱ्याच बॉलिवूड गाण्यांमध्ये तन्नाज दिसली आहे.
-
इतकंच नव्हे तर तन्नाजने नोरा फतेही, वरुण धवन, सनी लिओनी यांच्याबरोबर स्टेज शेअर केलं आहे.
-
तन्नाजने बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनही काम केलं आहे. ‘अॅनिमल’मधल्या २ मिनिटांच्या एका छोट्याश्या गाण्याने या बोल्ड तन्नाज दावूदीची सर्वत्र चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : तन्नाज दावूदी / इंस्टाग्राम पेज)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”