-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम मराठमोळी गायिका मुग्धा वैशंपायनने आज (२१ डिसेंबर) रोजी प्रथमेश लघाटे बरोबर लग्नगाठ बांधली.
-
५ नोव्हेंबरला मुग्धा आणि प्रथमेशचा साखरपुडा पारंपरिक पद्धतीने पार पडला होता.
-
लग्नसोहळ्यासाठी मुग्धाने पिवळ्या रंगाची हिरवी काठ असलेली नऊवारी साडी नेसली आहे.
-
गायक रोहित राऊत आणि शमिका भिडेने इन्स्टाग्राम स्टोरीवर मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नातील फोटो शेअर केले आहे.
-
प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता आणि पुणेरी पगडी परिधान केली आहे.
-
पुणेरी पगडी हा अस्सल महाराष्ट्रीय पगडीचा प्रकार आहे.
-
चिपळूणमध्ये मुग्धा आणि प्रथमेशचा लग्नसोहळा पार पडला.
-
“सौ. मुग्धा प्रथमेश लघाटे” असे कॅप्शन रोहित राऊतने या फोटोला दिले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
-
लग्नात मुग्धा आणि प्रथमेशची सुंदर रंगोळी काढण्यात आली होती.
-
या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
मुग्धा आणि प्रथमेशने इन्स्टाग्रामवर ग्रहमख विधी आणि हळदीसोहळ्यातील फोटो शेअर केले होते.
-
ग्रहमख विधीसाठी मुग्धाने निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”