-
मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही लोकप्रिय जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. ( फोटो : रोहित राऊत इन्स्टाग्राम )
-
मुग्धा-प्रथमेशच्या विवाहसोहळ्याला जवळच्या नातेवाईंकांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ( फोटो : जुईली जोगळेकर इन्स्टाग्राम )
-
सध्या दोघांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ( फोटो : जुईली जोगळेकर इन्स्टाग्राम )
-
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रथमेश मुग्धाने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
‘सारेगमप’ संपल्यावर पुढे काही वर्षांनी दोघेही एकत्र गाण्याचे कार्यक्रम करू लागले. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
गाण्यांच्या कार्यक्रमांमुळे त्यांचं भेटणं व्हायचं आणि त्या दरम्यानच दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
एकदा गाण्याच्या कार्यक्रमाची तालीम सुरु असताना प्रथमेशने आपल्या प्रेमाची कबुली मुग्धासमोर दिली. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
मुग्धाने प्रथमेशला होकार द्यायला तीन-चार दिवस लावले. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
दोन ते तीन दिवसांनी गायिकेने त्याला भेटायला बोलावलं आणि होकार दिला होता. गेली साडेतीन ते चार वर्षे मुग्धा-प्रथमेश एकमेकांना डेट करत आहेत. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
प्रथमेश आणि मुग्धाच्या नात्याबद्दल त्यांच्या घरच्यांना आधीपासून अंदाज होता. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
परंतु, दोघांनीही शिक्षण पूर्ण झाल्यावर या नात्याबद्दल घरी सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
पाच-सहा महिन्यांपूर्वी मुग्धा-प्रथमेशने त्यांच्या नात्याविषयी त्यांच्या घरच्यांना सांगितलं व सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
आता नुकतेच दोघेही लग्नबंधनात अडकले असून एका नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
-
दरम्यान, मुग्धा-प्रथमेशवर कलाकार मंडळींसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षांव करण्यात येत आहे. ( फोटो : मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम )
![Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes, Quotes in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-18-at-11.58.10.jpeg?w=300&h=200&crop=1)
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज