-
Mukta-Sagar Wedding: स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत हो.. नाही.. म्हणता म्हणता अखेर मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
-
खरतर दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई.
-
सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे.
-
गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही असणार आहे.
-
लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे.
-
संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे.
-
त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता-सागर सोबतच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत.
-
मुक्ता-सागरच्या लग्नासाठी ठरलं तर मग मालिकेतले अर्जुन-सायली लावली खास हजेरी लावणार आहेत.
-
याबरोबरच लग्नात सावनीची देखिल एण्ट्री होणार आहे.
-
सावनीच्या येण्याने बरंच नाट्यही रंगणार आहे.
-
त्यामुळे लग्न निर्विध्नपणे पार पडणार का? याची उत्सुकता नक्कीच असेल.
-
तेव्हा मुक्ता आणि सागरच्या लग्नाला नक्की यायचं हं.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”