-
Shrenu Parikh Married Akshay Mhatre : अभिनयविश्वात सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक अनेक कलाकार यंदा लग्नबंधनात अडकले आहेत. आता टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारीख व अक्षय म्हात्रे लग्नबंधनात अडकले आहेत.
-
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारीखने अभिनेता अक्षय म्हात्रेशी लग्नगाठ बांधली.
-
श्रेनू गुजराती आहे तर अक्षय मराठी आहे. दोघांनीही मराठी व गुजराती पारंपारिक पद्धतीने लग्न केले, असं वृत्त ‘दैनिक जागरण’ने दिलंय.
-
लग्नात श्रेनूने केशरी व लाल रंगाचा लेहेंगा निवडला, तर अक्षय लाल रंगाच्या शेरवानीत खूपच सुंदर दिसत होता.
-
दोघांनी शाही पद्धतीने २१ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे ठिकाणही खूप सुंदर होते.
-
श्रेनू व अक्षय यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेलं जोडपं आता एकत्र संसार करणार आहे.
-
त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट्स करून इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींसह चाहते शुभेच्छा देत आहेत.
-
श्रेनू पारीख आणि अक्षय म्हात्रे यांची प्रेमकहाणी २०२१ मध्ये सुरू झाली होती.
-
दोघांची भेट ‘घर एक मंदिर’ या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती.
-
त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
(फोटो सौजन्य – श्रेनू पारीखच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”