-
अभिनेत्री अंकिता जैन सध्या ‘बिग बॉस 17’च्या घरात एकत्र आहेत. या जोडप्याचे चाहते त्यांच्यावरील सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करत आहेत.
-
मात्र, अनेकांना हे माहीत नाही की अंकित आणि विकीची भेट अंकिताचा एक्सबॉयफ्रेंड दिवंगत सुशांत सिंह राजपूत याच्याच माध्यमातून झाली होती.
-
बिग बॉस 17 च्या एका एपिसोडमध्ये अंकिताने सांगितले की तिची आणि विकीची भेट त्यांच्या नशिबात लिहिलेली होती. आज आपण विकी-अंकिताच्या नात्यावर नजर टाकुया.
-
२०१३ साली अंकिता पहिल्यांदाच विकी जैनला भेटली होती. त्यावेळी सुशांत अंकिताचा बॉयफ्रेंड होता आणि त्याच्याच माध्यमातून अंकिता आणि विकीची भेट झाली होती.
-
त्यावेळी सुशांत आणि अंकिता ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत एकत्र काम करत होते. याच दरम्यान सुशांत आणि विकीची चांगली मैत्री झाली.
-
अंकिता आणि विकी जेव्हा एकमेकांना भेटले तेव्हा ते दोघेही वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होते. तथापि, काही वर्षांमध्ये ते एकमेकांचे चांगले मित्र बनले.
-
सुशांत आणि अंकिता २०१६ साली वेगळे झाले. त्यावेळेस त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता. बिगबॉसच्या घरात अंकिताने खुलासा केला की तिच्या आणि सुशांतमध्ये एका रात्रीत गोष्टी बदलल्या आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
-
या निर्णयाचा अंकिताला खूप त्रास झाला होता. तिने सांगितल्यानुसार ब्रेकअप झाल्यावर सुमारे अडीच वर्ष ती डिप्रेशनमध्ये होती. यादरम्यान, अंकिताला विकीच्या मैत्रीमध्ये चांगला आधार मिळाला.
-
एका एपिसोडमध्ये तिने सांगितले की, विकी सुशांतचाही मित्र होता. सुशांतच्या मृत्यूच्या वेळेस विकीने खूप साथ दिली.
-
ती पुढे म्हणाली, “जेव्हा काही नसतेच तेव्हा तुम्ही काय करणार? जेव्हा कोणी जग सोडून जाते तेव्हा तुम्ही काय करणार? मला कोणीच आधार नव्हता, पण विकीने सर्वकाही खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेतले. त्याने साथ दिली नसती तर मी काहीही करू शकले नसते.”
-
काही वर्षांच्या मैत्रीनंतर अंकिता आणि विकी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी २०१८ मध्ये डेटिंग करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस अंकिताने अधिकृतपणे नातेसंबंध जाहीर केले.
-
बिग बॉस 17 मध्ये अंकिता आणि विकीने करवा चौथ साजरी केली. त्यांनी त्यांच्या घरातील सहकाऱ्यांना त्यांची प्रेमकहाणीही सांगितली.
-
अंकिता आणि विकीने त्यांच्यासाठी कुटुंब किती महत्त्वाचे आहे याबद्दल भाष्य केले. विकीने सांगितले की त्याचा व्यवसाय बिलासपूरमध्ये आहे आणि तो मुंबईत येऊन अंकिताच्या घरी आठवडाभर राहायचा जेणेकरून तो तिच्या कुटुंबाशी एकरूप होऊ शकेल. दुसरीकडे, अंकितानेही लग्नापूर्वी विकीच्या पालकांची भेट घेतली होती.
-
अंकिता आणि विकीने डिसेंबर २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचे लग्न एका भव्य सोहळ्यापेक्षा कमी नव्हते. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही यात हजेरी लावली होती.
-
ऑगस्ट २०२३ साली या जोडप्याने पुन्हा एकदा लग्न केले. यावेळी ते युरोपला गेले होते, तेव्हा त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.
-
या लग्नातील एक खास व्हिडीओ अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये विकीने गुडघ्यावर बसून अंकिताच्या हाताचे चुंबन घेतले आणि त्यांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या.
-
‘बिग बॉस 17’मध्ये येण्याबाबत अंकिताने खुलासा केला की तिला या शोबद्दल खात्री नव्हती. मात्र विकी या शोचा मोठा चाहता असून त्याला या कार्यक्रमात यायचे होते आणि त्यानेच अंकिताला शोमध्ये येण्याबाबत समजावले.
-
तसेच, या दोघांनीही एकत्र हा शो करण्यामागचे कारण म्हणजे ते पुढील वर्षी बाळाला जन्म देण्याच्या विचारात आहेत. (Photos: Ankita Lokhande/Instagram)

“विकी अरे काय आहेस तू…”, ‘छावा’ पाहून आलिया भट्ट झाली थक्क; तर करण जोहर म्हणाला, “शेवटचा क्षण…”