-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे लवकरच आता लग्नबंधनात अडकणार आहे. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही महिन्यांपासून गौतमीच्या या फोटोमुळे अभिनेता स्वानंद तेंडुलकरबरोबर तिचं अफेअर असल्याची चर्चा सुरू होती. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
पण अफेअरच्या चर्चांवर गौतमीसह बहीण मृण्मयी देशपांडेने देखील मौन पाळलं. (फोटो सौजन्य – मृण्मयी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
काल (२३ डिसेंबरला) गौतमीने थेट मेहंदीचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. (फोटो सौजन्य – मृण्मयी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
आज गौतमीला स्वानंद तेंडुलकरची उष्टी हळद लागली आहे. (फोटो सौजन्य- पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)
-
गौतमी-स्वानंदच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य – तेजस देसाई इन्स्टाग्राम)
-
अभिनेता सारंग साठेसह त्याची पत्नी पॉलाने इन्स्टाग्रामवर गौतमी-स्वानंदच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)
-
हळदीमध्ये गौतमी हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य- पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)
-
तर स्वानंदने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजामा आणि त्यावर स्कार्फ घेतला आहे. (फोटो सौजन्य- पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)
-
गौतमी-स्वानंदची जंगी हळद झाली आहे. (फोटो सौजन्य – अनिकेत जाधव इन्स्टाग्राम)
-
गौतमी-स्वानंदच्या हळदीचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत आले आहेत. (फोटो सौजन्य – तेजस देसाई इन्स्टाग्राम)
-
अभिनेता सारंग साठेने ‘कुंकू हसलं, हळद पण हसली’ असं लिहित गौतमी-स्वानंदचा हा हळदीचा फोटो शेअर केला आहे. (फोटो सौजन्य- सारंग साठे इन्स्टाग्राम)

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार