-
२०२३ मध्ये अनेक बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी काही चित्रपट वादात सापडले. काही चित्रपटांमधील कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते
-
प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट त्यातील संवाद, वेशभूषा आणि स्टारकास्टमुळे वादात राहिला. या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. याचिकेत त्यांच्यावर भगवान राम आणि भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. (अजून चित्रपटातून)
-
‘आदिपुरुष’ रिलीज होण्यापूर्वी त्याची स्टारकास्ट तिरुमला येथे दर्शनासाठी पोहोचली होती. यादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सीते’ची भूमिका साकारणारी क्रिती सेननच्या गालावर चित्रपटाचा निर्माता ओम रावतने किस केलं होतं. यावरून दोघांनाही खूप ट्रोल करण्यात आले.
-
करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण’मध्ये वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केल्यानंतर दीपिका पादुकोणला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. दीपिका म्हणालेली की, रणवीर सिंहबरोबर रिलेशनशिपमध्ये असूनही ती इतर लोकांना भेटत होती. यावरून दीपिका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. (अजून चित्रपटातून)
-
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबाबत बराच वाद झाला होता. एकीकडे मुस्लीम समाजाचा चित्रपटाला विरोध होताना दिसत होता तर दुसरीकडे चित्रपटाबाबत राजकारणात गदारोळ होताना दिसत होता. चित्रपटावर बहिष्कार टाकून तो प्रदर्शित करण्यापासून रोखण्याची मागणीही करण्यात आली होती.
-
‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीवरून बराच वाद झाला होता. त्यामुळे या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. प्रचंड विरोध पाहता चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटात काही बदल केले होते.
-
‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यात चित्रित केलेल्या इंटिमेट सीनमुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. बोल्ड सीन केल्यामुळे रणबीरही सोशल मीडियावर ट्रोलही झाला होता. (अजून चित्रपटातून)
-
‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटात २१ वर्षीय अवनीत कौरला लिप लॉक केल्याबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीला टीकेला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणी नवाजुद्दीनने आपल्या स्पष्टीकरणात शाहरुख खानचे उदाहरण दिले होते आणि रोमान्ससाठी वय नसते, ते वयहीन असते, असे म्हटले होते. (अजून चित्रपटातून)
-
यावर्षी लिपस्टिकच्या वादामुळे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची नावे चर्चेत होती. आलियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा नवरा रणबीर तिला लिपस्टिक लावण्यास मनाई करतो, कारण त्याला लिपस्टिक लावणे आवडत नाही. यानंतर रणबीरवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. (फोटो स्रोत: @aliaabhatt/instagram)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”