-
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे त्या मुक्ता-सागरचा लग्नसोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे. (फोटो सौजन्य – पीआर फोटो)
-
मेहंदी, संगीत आणि हळद तर थाटात पार पडली आहे. आता उत्सुकता आहे ती लग्नाची. (फोटो सौजन्य- तेजश्री प्रधान फॅनपेज)
-
गोखले आणि कोळी कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून लग्नसोहळ्यात स्टार प्रवाह परिवारातले खास पाहुणेही येणार आहेत. (फोटो सौजन्य – पीआर फोटो)
-
गेल्या कित्येक दिवसांपासून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य – पीआर फोटो)
-
लवकरच मुक्ता-सागरचा केळवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – पीआर फोटो)
-
खास अलिबागच्या कोळीवाड्यात सागर-मुक्ताचं केळवण होणार आहे. (फोटो सौजन्य – नलिनी मुंबईकर इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकर सागर-मुक्ताचं केळवणं करणार आहेत. (फोटो सौजन्य – नलिनी मुंबईकर इन्स्टाग्राम)
-
सागर-मुक्ताच्या केळवणाला त्यांच्याबरोबर इंद्रा आणि सई देखील असणार आहेत. (फोटो सौजन्य – नलिनी मुंबईकर इन्स्टाग्राम)
-
अलिबागचा संपूर्ण कोळीवाडा सागर-मुक्ताच्या केळवणासाठी सजला आहे. (फोटो सौजन्य – नलिनी मुंबईकर इन्स्टाग्राम)
-
केळवणासाठी आकर्षित रांगोळी काढली आहे. (फोटो सौजन्य – नलिनी मुंबईकर इन्स्टाग्राम)
-
कोळी गाण्यांच्या ठेक्यावर मुक्ता-सागर, सई आणि इंद्राचं जल्लोषात स्वागत होताना पाहायला मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – नलिनी मुंबईकर इन्स्टाग्राम)
-
तसेच केळवणासाठी नलिनी यांच्या हातच्या सुग्रास जेवणाची मेजवानी होणार आहे. (फोटो सौजन्य – नलिनी मुंबईकर इन्स्टाग्राम)
-
कोळी पद्धतीत सागर-मुक्ताचं केळवण पार पडणार आहे. (फोटो सौजन्य – पीआर फोटो)
-
या केळवणाच्या कार्यक्रमाची सांगता मुक्ताच्या खास उखाण्याने होणार आहे. (फोटो सौजन्य – पीआर फोटो)
-
‘नलिनी काकुंनी आमंत्रण देऊन प्रेमाची गोष्ट केली मोठी. स्टार प्रवाहच्या साक्षीने भरली मुक्ताची खणा नारळाने ओटी. अलिबागकरांनी घातलाय सागर-मुक्ताच्या केळवणाचा घाट. पाहण्यासाठी सई सुद्धा पोहोचली धरुन इंद्रा आजीचा हात,’ असा उखाणा मुक्ता घेताना पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – नलिनी मुंबईकर इन्स्टाग्राम)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…