-
गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर यांचा विवाहसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला.
-
या दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकार व जवळच्या कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती.
-
गौतमी-स्वानंदच्या लग्नातील बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या दोघांनी लग्नासाठी खास पारंपरिक लूक केला होता.
-
गौतमीने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली होती.
-
या सगळ्यात अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगली आहे.
-
गौतमीच्या मंगळसूत्राच्या साध्या व सुंदर अशा डिझाइनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये काळे मणी व दोन डवल्या आहेत.
-
गौतमीच्या पारंपरिक मंगळसूत्राला खास मॉर्डन टच देण्यात आला आहे. अभिनेत्रीने परंपरेनुसार माहेर व सासरकडची अशी दोन मंगळसूत्र घातली आहेत.
-
दरम्यान, गौतमी-स्वानंदच्या लग्नाच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा रंगली असून कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : गौतमी/स्वानंद इन्स्टाग्राम @clickography )

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?