-
मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने काल (२५ डिसेंबर) रोजी गायक आशिष कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली.
-
“आयुष्यभराची #आनंदी साथ” असे कॅप्शन देत स्वानंदीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लग्नसोहळ्यासाठी स्वानंदीने जांभळ्या रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली होती.
-
नऊवारी साडीवर स्वानंदीने मॅचिंग डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता.
-
स्वानंदीच्या ब्लाऊजवर सुंदर असे एम्ब्रॉयडरीचे (आरीभारत) काम केले आहे.
-
लग्नसोहळ्यात स्वानंदीने पारंपरिक दगिने परिधान केले होते.
-
लग्न लागताना स्वानंदीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
-
आशिषने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
स्वानंदी आणि आशिषच्या लग्नातील फोटोंवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
जुलै महिन्यात स्वानंदी आणि आशिषचा साखरपुडा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…