-
बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
आत्तापर्यंत सलमानने बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
-
सलमान खानने १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
या चित्रपटांसाठी सलमानने फक्त ११ हजार रुपये फी घेतली होती.
-
सध्या सलमान एका चित्रपटासाठी ५० ते १०० करोड रुपये मानधन घेतो.
-
मीडिया रिपोर्टनुसार सलमान खान २ हजार ८५० कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.
-
चित्रपटांव्यतरिक्त सलमान बिग बॉस सारख्या टेलिव्हिजवरील लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करतो.
-
बिग बॉसच्या एका भागासाठी सलमानने १२ कोटी रुपये फी घेतली आहे.
-
तसेच जाहीरातींमधूनही सलमान ७ ते ८ कोटी रुपये कमावतो.
-
मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान आपल्या कुटुंबासह राहतो.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपार्टमेंटची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे.
-
तसेच त्याचे पनवेलमध्ये एक आलिशान फार्महाऊस आहे. या फार्महाऊसची किंमत ८० कोटी रुपये आहे.
-
परदेशातही सलमानची मोठी संपत्ती आहे.
-
दुबईमध्ये सलमानचे आलिशान घर आहे. ज्याची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे.
-
या व्यतरिक्त सलमानकडे रोल्स रॉयस, मर्सिडीज-बेंज जीएल क्लास, रेंज रोवर, लेक्सस, बीएमडब्ल्यू एक्स6, ऑडीआरएस7, टोयोटा लैंड क्रूजर सारख्या महागड्या गाड्याही आहेत.

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…