-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबर २०२३ रोजी पार पडला.
-
सध्या या दोघांच्या मेहंदी, संगीत व लग्न समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
अभिनेत्रीने लग्न लागताना खास पिवळी पैठणी साडी नेसली होती.
-
थाटामाटात लग्न पार पडल्यावर स्वानंदीने “मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर-माहेरची खूण आशिषचं नाव घेते कुलकर्ण्यांची सून.” हा खास उखाणा घेतला होता.
-
उखाण्यात मंगळसूत्राचा उल्लेख केल्यामुळे सध्या स्वानंदीच्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर विशेष चर्चा होत आहे.
-
अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं साधं-सुंदर मंगळसूत्र व माहेरचा मुहूर्तमणी पाहायला मिळत आहे.
-
तिच्या मंगळसूत्राच्या पारंपरिक व आकर्षक डिझाइनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
स्वानंदी-आशिषवर सध्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
दरम्यान, स्वानंदीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आतापर्यंत तिने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” अशा लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर इन्स्टाग्राम @lensfixed_onkarabhyankar )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”