-
२०२३ हे वर्ष काही खास सिनेमांमुळे बॉलिवूड सह प्रादेशिक भाषांमधील चित्रपट सृष्टींसाठी खास ठरलं. पण यंदाच्या वर्षी यशाच्या तोडीस तोड वाद सुद्धा चर्चेत आले होते. आज आपण २०२३ मधील सर्वात वादग्रस्त ठरलेल्या काही कलाकारांच्या चित्रपटांचा आढावा घेणार आहोत
-
प्रभासच्या अभिनयाने सजलेला महत्त्वकांक्षी चित्रपट म्हणजेच ‘आदिपुरुष’ हा या वर्षाच्या सुरुवातीलाच वादाचा मुद्दा ठरला होता. चित्रपटातील डायलॉगपासून ते स्टार कास्टच्या कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींमुळे सिनेमावर बंदी घालण्याची सुद्धा मागणी झाली होती. प्रभू राम व भारतीय संस्कृतीला गालबोट लावणारा हा सिनेमा असल्याचे ही काहींनी म्हटले होते.
-
आदिपुरुष सिनेमामुळेच अभिनेत्री क्रिती सॅनॉन वादात आली होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान स्टार कास्ट तिरुमला येथे दर्शनासाठी गेली होती. त्यावेळेस मंदिरातून बाहेर पडल्यावर क्रितीने निर्माता ओम रावत याला गुडबाय करताना किस केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता व त्यावर काहींनी ट्रोलिंग केले होते. क्रितीने या चित्रपटात सीतेची भूमिका साकारली होती
-
करण जोहरचा प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांनी आपल्या नात्याविषयी अनेक खुलासे केले होते. त्यावेळी दीपिकाने असं म्हटलं होतं की रणवीर बरोबर रिलेशनमध्ये असतानाही ती इतरांना सुद्धा डेटसाठी भेटत होती. यावरून सोशल मीडियावर दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.
-
काश्मीर फाईल्सप्रमाणे यंदाच्या वर्षी ‘द केरला स्टोरी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सिनेमावर प्रचंड टीका करण्यात आली होती तर यावरून राजकीय प्रपोगंडा आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही आरोप करण्यात आले होते. प्रदर्शनाआधीच झालेल्या वादामुळे हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी सुद्धा होती.
-
शाहरुख- दीपिकाचा बहुचर्चित पठाण चित्रपट आणि त्यातील भगव्या रंगाच्या बिकीनीचा वाद या वर्षात खूप हायलाईट झाला. बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी वादाचा मुद्दा ठरली होती. विरोध होऊ लागल्यावर चित्रपटातील काही सीन्सला कात्री लावण्यात आली होती.
-
वर्षाच्या सरतेशेवटी आलेला सिनेमा ‘ऍनिमल’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला पण त्याला तितकाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. बोल्ड सीन्स व्यक्तिरिक्त सुद्धा रणबीर कपूरच्या नकारात्मक व स्त्रीद्वेष्ट्या भूमिकेवरून प्रचंड टीका करण्यात आली होती.
-
‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटात २१ वर्षीच्या अभिनेत्री अवनीत कौर सह लीप लॉक सीन देण्यावरून नवाझुद्दीन सिद्दीकीला टीकेला सामोरे जावे लागले होते. नवाझुद्दीनने यावर उत्तर देताना शाहरुखचे नाव घेत ‘रोमांस करण्याला कुठे वयाचं बंधन असतं’ असं म्हणत स्पष्टीकरण दिलं होतं.
-
चित्रपटाच्या व्यतिरिक्त खासगी आयुष्याबद्दल केलेल्या विधानावरूनही रणबीर कपूर व आलिया भट चर्चेत आले होते. आलियाने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की, रणबीरला तिने लिपस्टिक लावलेलं आवडत नाही म्हणून तो तिला लिपस्टिक लावली की लगेच पुसून टाकायला सांगतो. यानंतर अनेकांनी रणबीरला ‘टॉक्सिक’ म्हणत टीका केली होती. (Photo Source: @aliaabhatt/instagram)
![9 February 2025 Rashi Bhavishya](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/9-February-2025-Rashi-Bhavishya.jpg?w=300&h=200&crop=1)
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल