-
बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित अलीकडे परिधान केलेल्या काळ्या रंगात आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या लूकमधील तिचे सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण होईल.
-
लाखो लोक माधुरी दीक्षितच्या स्टाइलचे आणि किलर स्माईलचे चाहते आहेत. एक्सप्रेशन क्वीनचे इंस्टाग्रामवर 37.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
या नव्या फोटोतील तिची स्टाईल आजच्या तरुण अभिनेत्रींना लाजवेल अशी आहे. तिचा या नव्या लुकने आता सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
माधुरी दीक्षित अभिनयाच्या दुनियेत आजही तितक्याच सक्रियपणे काम करत आहे. लवकरच ती आगामी पंचक या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारीच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित बद्दलच्या बातम्या आल्या होत्या की ती राजकारणात प्रवेश करेल आणि आगामी लोकसभा निवडणूक 2024 लढवेल.
-
आता यावर माधुरी दीक्षितने मोठा खुलासा केला आहे. नुकत्यात एका न्यूज चॅनलला माधुरी दीक्षितने मुलाखत दिली. ज्यामध्ये राजकारणात येण्याबाबत तिने मोठा खुलासा केला आहे.
-
जेव्हा माधुरीला विचारण्यात आले की ती राजकारणात येण्याचा विचार करत आहे का? या मुद्द्यावर माधुरी म्हणाली, अजिबात नाही. मला राजकारणात अजिबात रस नाही. निवडणुका जवळ आल्यावर मला अनेकदा असे प्रश्न विचारले जातात. पण ते माझे व्यक्तिमत्त्व नाही आणि मी एक अभिनेत्री आहे. मी अभिनय करत आहे आणि मला हे चालू ठेवायचे आहे. (सर्व फोटो क्रेडिट- माधुरी दीक्षित इन्स्टा)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार