-
मराठी कलाविश्वात सध्या जोरदार लग्नसराई सुरू आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत.
-
काल, २८ डिसेंबरला ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ मालिकेतील अश्विनी म्हणजेच अभिनेत्री सोनल पवार लग्नबंधनात अडकली. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
नोव्हेंबर महिन्यात सोनलने समीर पालुष्टेबरोबर गुपचूप साखरपुडा उरकला होता. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
तेव्हापासून सोनल कधी लग्नबंधनात अडकणार, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. (फोटो सौजन्य-सिने अपडेट इन्स्टाग्राम)
-
अखेर २८ डिसेंबरला सोनलने समीरबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. (फोटो सौजन्य-सिने अपडेट इन्स्टाग्राम)
-
मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा सोनलचा पार पडला. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
सोनलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
लग्नात सोनलने मजंठा रंगाची नऊवारी नेसली होती. त्यावर भरजरी दागिने परिधान केले होते. (फोटो सौजन्य-सिने अपडेट इन्स्टाग्राम)
-
सोनलच्या नवऱ्याने लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर शॉल घेतली होती. (फोटो सौजन्य-सिने अपडेट इन्स्टाग्राम)
-
लग्नानंतर रिसेप्शनसाठी सोनल-सागरने खास लूक केला होता. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
सोनलने ऑफ व्हाइट रंगाचा लेहेंगा आणि सागरने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
सध्या अनेक कलाकार मंडळी सोनल-सागरला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
सोनलचा नवरा समीर पालुष्टे हा एक व्यावसायिक आहे. तो स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर व सीईओ आहे. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
तसेच समीर डिजिटल मार्केटर व ब्रँड कन्सलटंट म्हणून काम करतो. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)
-
विशेष म्हणजे सोनलच्या नवऱ्याला भारत सरकारच्या निवडणूक आयोगाकडून पुरस्कार मिळाला होता. (फोटो सौजन्य – सोनल पवार इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल