-
अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
२५ डिसेंबरला गौतमीचा स्वानंद तेंडुलकरबरोबर मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
देशपांडेंची लाडकी लेक गौतमी आता तेंडुलकरांची सून झाली.(फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असा समारंभपूर्वक गौतमीचा लग्नसोहळा पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
अजूनही गौतमी-स्वानंदच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
लग्नानंतर गौतमी-स्वानंदचं सध्या कोकण दर्शन सुरू आहे. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
-
‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच कोकण कन्या अंकिता वालावलकर गौतमी-स्वानंदला कोकण फिरवत आहे. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
-
अंकिता वालावलकरने गौतमी-स्वानंदचे कोकणातील फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
-
व्हायरल फोटो आणि व्हिडीओमध्ये गौतमी-स्वानंद कोकण ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
-
गौतमी-स्वानंद देवबागला फिरत आहेत. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
-
कोकण दौऱ्यादरम्यान गौतमी-स्वानंदचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
-
या फोटोमध्ये दोघं मासांहारी जेवणावर ताव मारताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
-
अंकिता वालावलकरने गौतमी-स्वानंदसाठी कोकण दर्शनाचं खास नियोजन केल्याचं दिसत आहे. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
-
अंकिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये गौतमी-स्वानंद वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतानाही पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
-
कोकण दौऱ्यादरम्यान गौतमी-स्वानंद अंकिताच्या घरी देखील गेले होते. यावेळी अंकिताची आई गौतमीच्या कामाचं कौतुक करताना पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य – अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम)
Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण