-
सुकन्या व संजय मोने यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.
-
या जोडप्याला जुलिया नावाची एकुलती एक मुलगी आहे.
-
सुकन्या मोने त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत लेकीबद्दल भरभरून बोलत असतात.
-
जुलिया परदेशात उच्च शिक्षण घेत असून नुकतीच सुट्टी असल्याने भारतात परतली आहे.
-
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात सुकन्या मोनेंच्या बालपणीची लहानशी भूमिका जुलियाने साकारली होती.
-
तेव्हापासून जुलिया अभिनय क्षेत्रात येणार का? तिचं शिक्षण काय, ती नेमकं काय करते? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुलियाने तिचं शिक्षण व काम याबद्दल खुलासा केला आहे.
-
जुलिया म्हणाली, “वन्यप्राणी जीवशास्त्र (वाइल्डलाइफ बायोलॉजी) हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे आणि माझ्या पदवीचं संपूर्ण नाव ‘मास्टर इन अॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ बायोलॉजी’ असं आहे.”
-
जुलियाच्या आई-वडिलांना सुरुवातीला या अभ्यासक्रमाबद्दल काहीच माहीत नव्हतं.
-
सुकन्या मोने याविषयी सांगताना म्हणाल्या, “अॅनिमल सायकोलॉजी हा तिचा मुख्य विषय होता. पण, एके दिवशी अचानक तिने या वेगळ्या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात जाणार असल्याचं आम्हाला सांगितलं.”
-
जंगल सफारी व प्राण्यांविषयी जुलियाला बालपणापासून आवड होती.
-
त्यामुळेच भविष्यात प्राणीशास्त्रात करिअर करण्याचा तिने निर्णय घेतला.
-
लेकीने इंडस्ट्रीत येऊ नये आणि वेगळं काहीतरी शिकावं अशी सुकन्या मोनेंची पहिल्यापासून इच्छा होती.
-
जुलिया ऑस्ट्रेलियाला गेल्यापासून सुकन्या व संजय मोने दोघेही लाडक्या लेकीची आठवण काढत असतात.
-
दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलियात नोकरी करून जुलिया तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सुकन्या मोने इन्स्टाग्राम )
![Mesh To Meen Horoscope](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Mesh-To-Meen-Horoscope-In-Marathi.jpg?w=300&h=200&crop=1)
८ फेब्रुवारी पंचांग: जया एकादशीला लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वादाने कर्क, कन्या राशीला होईल लाभ; तुमचे नशीब आज बदलणार का ?