-
‘आई कुठे काय करते’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेत ‘आरोही’ची भूमिका अभिनेत्री कौमुदी वलोकर साकारत आहे.
-
३१ डिसेंबर रोजी कौमुदीचा साखरपुडा आकाश चौकसेबरोबर थाटामाटात पार पडला आहे.
-
साखरपुडा सोहळ्यातील काही खास फोटो कौमुदीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
साखरपुडा सोहळ्यासाठी कौमुदी आणि आकाशने अबोली रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
-
कौमुदीच्या फोटोंवर मधुराणी प्रभुलकरने ‘Beautiful Couple’ अशी कमेंट केली आहे.
-
कौमुदी आणि आकाशच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
‘शाळा’ या मराठी चित्रपटात कौमुदी दिसली होती.
-
कौमुदीने ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’ आणि ‘मी वसंतराव’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
कौमुदी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी झी युवावरील ‘देवाशप्पथ’ या मालिकेत झळकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : कौमुदी वलोकर/इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य