-
बॉलीवूड अभिनेता व मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
-
आमिरची लाडकी लेक आयरा खान ३ जानेवारीला तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
सध्या दोघांच्याही घरात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
आयरा-नुपूरचं लग्न मुंबईत मराठमोळ्या पद्धतीने पार पडणार आहे.
-
या दोघांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गुपचूप साखरपुडा उरकत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
-
आयरा खानचा होणारा नवरा नुपूर शिखरे नेमका कोण आहे व तो काय काम करतो? जाणून घेऊयात…
-
नुपूर शिखरे हा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. तो अनेकवर्ष आमिर खान व सुष्मिता सेन यांचा पर्सनल ट्रेनर होता.
-
याशिवाय नुपूर फिटनेस तज्ज्ञ व सल्लागार म्हणून देखील ओळखला जातो.
-
२०२० मध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या काळात नुपूरने तिला ट्रेनिंग दिलं होतं. त्यांची पहिली भेट जिममध्ये झाली होती.
-
याच दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरप्रमाणेच नुपूर उत्तम डान्सर सुद्धा आहे.
-
याशिवाय तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता.
-
नुपूरचा जन्म पुण्याचा असून त्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण झालं आहे.
-
दरम्यान, आयरा खान आणि नुपूर शिखरे ३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : आयरा खान इन्स्टाग्राम )
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO