-
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
आयरा नुपूर शिखरेबरोबर आज (०३ जानेवारी) रोजी लग्नगाठ बांधणार आहे.
-
नुपूर हा प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे.
-
नुकताच नुपूरने त्याच्या आईबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये आयराची सासू (प्रीतम शिखरे) यांचा जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील लूक आहे.
-
‘माऊली…’ असे कॅप्शन नुपूरने या फोटोला दिले आहे.
-
प्रीतम यांच्या नऊवारी साडीतील लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
-
नोव्हेंबर महिन्यात आयरा आणि नुपूरने गुपचूप साखरपुडा उरकला होता.
-
मुंबईत मराठमोळ्या पद्धतीने आयरा आणि नुपूरचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
-
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : नुपूर शिखरे आणि आयरा खान/इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य