-
आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आयरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या व नुपूरच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अशातच लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये खान कुटुंबाने परिधान केलेल्या पोशाखांवर एक नजर टाकूया. (स्रोत: वरिंदर चावला, इन्स्टाग्राम)
-
किरण पारंपारिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडीमध्ये सुंदर दिसत होती. तिने लॅव्हेंडर शेडची नऊवारी नेसली होती. तिचा लूक तिने कोल्हापुरी चपल, सनग्लासेस आणि नाजूक नेकलेसने पूर्ण केला होता.(स्रोत: इन्स्टाग्राम)
-
आमिरने कॅज्युअल धोतीसह केन्झो ब्रँडचा प्रिंटेड क्रू-नेक टी-शर्ट निवडला होता. त्याचबरोबर त्याने कोल्हापुरी चपल व ट्रेंडी चष्मा लावला होता. (स्रोत: वरिंदर चावला)
-
आयराची आई रीनाने लाल रंगाचा ब्लाउज सोनेरी काठांची हिरवी नऊवारी नेसली होती. (स्रोत: इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, आयराने हळदी समारंभासाठी एक कॅज्युअल लूक निवडला होता. स्कर्ट व शर्टबरोबर तिने पायात कोल्हापुरी चपल घातली होती. (स्रोत: वरिंदर चावला)
-
नुपूरच्या कुटुंबानेही हळदी समारंभात मराठमोळा लूक केला होता. नुपूरने केशरी कुर्ता आणि सोनेरी जॅकेट व धोतर नेसले होते. त्याच्या आईने जांभळी नऊवारी नेसली होती. (स्रोत: नुपूर शिखरे/इन्स्टाग्राम)
-
आयरा लाल रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती.(स्रोत: नुपूर शिखरे/इन्स्टाग्राम)
-
नुपूरने शेअर केलेल्या फोटोत तो व आयरा एकमेकांना घास भरवताना दिसत आहेत.(स्रोत: नुपूर शिखरे/इन्स्टाग्राम)
-
आयराच्या मेहेंदी समारंभासाठी आमिर त्याचा मुलगा जुनैदसह पोहोचला. आमिरने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि चष्मा घातलेला होता आणि जुनैद चेकर्ड-प्रिंट शर्टमध्ये होता. (स्रोत: वरिंदर चावला)
-
किरण आपला मुलगा आझादसह समारंभात पोहोचली. किरणने क्रीम कलरची रेशमी साडी परिधान केली होती. (स्रोत: वरिंदर चावला)
-
दुसरीकडे, आझादने खास कार्यक्रमासाठी पांढरा कुर्ता घातला होता. (स्रोत: वरिंदर चावला)
-
आयरा, खान कुटुंब व शिखरे कुटुंबातील लूकमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे या सर्वांनी त्यांचा लूक पूर्ण करण्यासाठी कोल्हापुरी चपल घातली होती.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा