-
गोड गळ्याची आणि सुंदर चेहऱ्याची नाजूक अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर.
-
टाईमपास चित्रपटापासून तिला खरी ओळख मिळाली.
-
त्यामुळे त्या चित्रपटातील प्राजू या पात्रावरूनच तिची सर्वाधिक ओळख आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून विविध मुलाखतींमध्ये ती विविध विषयांवर स्वतःचं मत मांडतेय.
-
तिची ही सर्व मते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
-
आता तिने एका मुलाखतीत लग्नाबाबतचं तिचं मत स्पष्टपण मांडलं आहे.
-
लग्नाआधी घर घ्यावं का? असा प्रश्न मुलाखतकाराने विचारला होता. त्यावर ती म्हणाली की, होय लग्नाआधी प्रत्येकाने घर घ्यायलाच हवं. “
-
“त्यापुढे जाऊन ती म्हणाली की लग्नाआधी प्रत्येकाने किमान सहा महिने तरी एकटं राहायला हवं. “
-
“एकटं का राहून बघावं, कारण खूप गोष्टी एकटं राहिल्यामुळे पुढे सॉर्ट होतात. “ -
“बेसिक लॉन्ड्रीपासून तुम्ही सगळं करू शकता. जेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्यासाठी काही करतो तेव्हा त्याची किंमत राहते. मुलींच्याही बाबतीत असंच होऊ शकतं. त्यामुळे लग्नाआधी तुम्ही एकटं राहिलं पाहिजे. “
-
“प्रत्येक पुरुषाला गृहिणीची सर्व कामं आली पाहिजेत. गृहिणींनीही बाहेरची कामे केली पाहिजेत.”
-
“एकटं राहिल्यामुळे तुम्ही खरंच मोठे होता. तुम्ही सर्वकाही एकट्याने मॅनेज करायला शिकता. आणि त्यानंतर तुम्ही पार्टनरसोबत राहता तेव्हा दोन प्रौढ व्यक्ती एकत्र येतात”, असं केतकी माटेगावकर म्हणाले.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे