-
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव लवकरच कोकोनट मोशन पिक्चर्स निर्मित ‘ओले आले’ चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटात सायली अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ चांदेकरबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.
-
बाप मुलाच्या नात्यावर आधारित या हृदयस्पर्शी चित्रपट आहे.
-
सायलीने इन्स्टाग्रामवर या चित्रपटातील ‘पहाडी’ लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
‘कसा वाटतोय हा लूक ???’ असे कॅप्शन सायलीने या फोटोंना दिले आहे.
-
सायलीच्या या लूकवर अभिनेत्री रिंकु राजगुरूने ‘Kamaal’ अशी कमेंट केली आहे तर अभिनेता सुबोध भावेने ‘भारी’ अशी कमेंट केली आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन विपुल मेहता यांनी केले आहे.
-
‘ओले आले’ हा चित्रपट ५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”