-
प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित व त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांची जोडी सध्या ‘पंचक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
‘पंचक’च्या निमित्ताने माधुरी दीक्षितने अलीकडेच सहकुटुंब सहपरिवार मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराला भेट देत बाप्पाचं दर्शन घेतलं.
-
बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने, दोन मुलं व तिचे सासू-सासरे उपस्थित होते.
-
यावेळी माधुरी दीक्षितच्या सासूबाईंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
डॉ. नेनेंचे आई-वडील याआधी फारसे कधीच कॅमेऱ्यासमोर आले नव्हते.
-
त्यामुळे सध्या नेने कुटुंबीयांचे कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
माधुरीच्या सासूबाई अनू नेने शॉर्ट हेअर लूकमध्ये फारच डॅशिंग आणि रुबाबदार दिसतात.
-
सासूबाई आणि माधुरीमध्ये अतिशय सुंदर नातं असल्याचं त्या दोघींचे सोशल मीडियावरील फोटो पाहून लक्षात येतं.
-
दरम्यान, नेने कुटुंबीयांच्या फॅमिली फोटोंवर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : डॉ. श्रीराम नेने इन्स्टाग्राम )

३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत…; मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ट्रोलिंगवर म्हणाला, “मी ज्या झोपडपट्टीतून…”