-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व लोकप्रिय गायक आशिष कुलकर्णी यांचा लग्नसोहळा २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात थाटामाटात पार पडला.
-
स्वानंदी-आशिषच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
-
त्यांच्या विवाहसोहळ्यातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, तुम्हाला माहितीये का? स्वानंदी-आशिषची पहिली भेट नेमकी कुठे झाली?
-
या जोडप्याने नुकत्याच एका मुलाखतीत त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.
-
रोहित राऊतची पत्नी जुईली जोगळेकरच्या वाढदिवसानिमित्त आशिष-स्वानंदीची पहिली भेट झाली होती.
-
रोहितने तेव्हा हळूच स्वानंदी टिकेकर येतेय असं आशिषला सांगितलं होतं. त्यावेळी अभिनेत्री ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती.
-
स्वानंदी-आशिष वर्सोव्यात हाकेच्या अंतरावर राहूनही एकमेकांना ओळखत नव्हते. जुईलीच्या वाढदिवसाला त्यांची पहिल्यांदा एकमेकांशी ओळख झाली.
-
याबद्दल आशिष सांगतो, “पार्टीहून निघताना आम्ही फोन नंबर घेतले. एकमेकांच्या घराजवळ राहत असल्याने आमच्या भेटीगाठी वाढल्या. आम्ही एकमेकांना मेसेज केले आणि पुढच्या दोन दिवसांत आमच्यात मैत्री झाली.”
-
ओळख झाल्यावर तिसऱ्या दिवशी आशिष कुलकर्णीने स्वानंदीला लग्नासाठी मागणी घातली होती.
-
आशिषने लग्नासाठी विचारल्यावर स्वानंदीने लगेच होकार कळवला होता.
-
याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “आमच्या नात्यात सगळ्या गोष्टी खूप पटकन जुळून आल्या. मी त्याला आधीच सांगितलं होतं की, जर तुला मी हो म्हटलं, तर आपण पुढच्या तीन महिन्यांत साखरपुडा करायचा आणि वर्षभरात लग्न करायचं.”
-
स्वानंदी तेव्हा मालिकेच्या शूटिंगमुळे दिवसभर व्यग्र असायची त्यामुळे या जोडप्याने एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी काही महिने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
-
तीन ते चार महिने एकमेकांना डेट केल्यावर दोघांनीही या नात्याबद्दल घरी सांगितलं.
-
आई-बाबांना नात्याबद्दल सांगितल्यावर गेल्यावर्षी जुलै महिन्यात स्वानंदी-आशिषने साखरपुडा केला.
-
साखरपुडा झाल्यावर ५ महिन्यांनी म्हणजेच २५ डिसेंबर २०२३ रोजी स्वानंदी-आशिष विवाहबंधनात अडकले. ( सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर इन्स्टाग्राम व @lensfixed_onkarabhyankar )
![Delhi Election Result 2025](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T193143.347.jpg?w=300&h=200&crop=1)
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर ‘आप’च्या नेत्यानेच केजरीवालांना दिला सल्ला; म्हणाले, “काँग्रेसबरोबर…”