-
अभिनेत्री बिपाशा बासूचा ७ जानेवारी रोजी वाढदिवस होता. तिने मालदीवमध्ये वाढदिवस साजरा केला.
-
बिपाशाने पती करण सिंग ग्रोव्हर आणि मुलगी देवी यांच्यासोबत मालदीवमध्ये वेळ घालवला. (फोटो: बिपाशा बासू/इन्स्टाग्राम)
-
तिने व्हेकेशनचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: बिपाशा बासू/इन्स्टाग्राम)
-
करण सिंग ग्रोव्हरने बिपाशाचा मुलीबरोबरचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (फोटो: करण सिंग ग्रोव्हर/इन्स्टाग्राम)
-
या पोस्टवर बिपाशाने लिहिलं, “माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि कायम माझा राहिल्याबद्दल धन्यवाद” (फोटो: बिपाशा बासू/इन्स्टाग्राम)
-
“परफेक्ट बर्थडे. मला फक्त माझ्या दोन बाळांची, सूर्यप्रकाश आणि पाण्याची गरज आहे,” असं बिपाशाने हा फोटो शेअर करत लिहिलं. (फोटो: बिपाशा बासू/इन्स्टाग्राम)
-
बिपाशा बासू आपल्या मुलीसोबत ट्विनिंग करताना दिसली. (फोटो: बिपाशा बासू/इन्स्टाग्राम)
-
बिपाशा आणि करण त्यांच्या लग्नाच्या सहा वर्षांनंतर १२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या पहिल्या मुलीचे पालक झाले. (फोटो: बिपाशा बासू/इन्स्टाग्राम)
-
बिपाशा आणि करणचे मालदीव फोटो चर्चेत आहे कारण, भारतात बॉयकॉट मालदीव ट्रेंड होत आहे. मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टीका केली आहे, तर काही मंत्र्यांनी भारतीय संस्कृतीला लक्ष्य केलं आहे, भारतीयांवर वर्णद्वेषी टीप्पण्या केल्या आहेत. त्यामुळे वातावरण तापलं आहे. बिपाशाच्या पोस्टवरही बॉयकॉटच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. (फोटो: बिपाशा बासू/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”