-
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे.
-
अभिनेत्री शिवानी रांगोळे या मालिकेत ‘अक्षरा’ची भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेत ‘अक्षरा’ची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत असणार आहे.
-
शिवानीने लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.
-
पहिल्या मकरसंक्रांतीला शिवानीने काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
-
विराजसने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
शिवानी आणि विराजसने हलव्याचे दागिने परिधान करुन फोटोशूट केले होते.
-
लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत ही नेहमी खास असते.
-
यावर्षी विराजस त्याच्या नाटकाच्या प्रयोगात व्यग्र आहे.
-
शिवानीदेखील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या शूटिंगमध्ये व्यग्र असणार आहे.
-
जर आम्हाला सुट्टी मिळाली शिवानी आणि विराजस आईच्या हातचं स्वादिष्ट जेवण जेवायला पुण्याच्या घरी जाणार आहेत.
-
मकरसंक्रांतची अस्सल मज्जा आमच्या पुण्याच्या घरच्या गच्चीवर येते तिथे आम्ही मस्त पतंग उडवतो असे शिवानीने सांगितले.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई