-
बॉलिवूडचा सर्वात हँडसम हृतिक रोशन आज (१०जानेवारी) त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
हृतिक रोशनने वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
हृतिक रोशनचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी झाला होता आणि हृतिक रोशनचे खरे नाव हृतिक राकेश नागरथ असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे.
-
हृतिक रोशनने २००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ मधून पदार्पण केले. नंतर त्याने सुझान खानशी लग्न केलं होतं.
-
परंतु काही मतभेदांनंतर त्यांचे १४ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आणि २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना दोन मुलं आहेत.
-
मोठ्या मुलाचे नाव रेहान आणि लहान मुलाचे नाव रिदान आहे.
-
‘मोस्ट हँडसम मॅन इन द वर्ल्ड’ हा किताब पटकावणाऱ्या हृतिकला एकेकाळी ३० हजार मुलींनी लग्नाची मागणी घातली होती, याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने केला होता.
-
हृतिक रोशनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास त्याची एकूण संपत्ती २७४५ कोटी रुपये आहे.
-
तो महिन्याला सुमारे २० कोटी रुपये कमावतो. तर त्याचे वार्षिक उत्पन्न २६० कोटींच्या आसपास आहे.
-
त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घरही आहे. हृतिक रोशनकडे दोन आलिशान अपार्टमेंटही आहेत. ते जुहू-वर्सोवा लिंक रोड मुंबई येथे आहेत. त्यांची किंमत सुमारे ९७.५० कोटी आहे.
-
याशिवाय त्यांच्याकडे फेरारी, व्होल्वो, ऑडी आणि मर्सिडीज सारख्या महागड्या गाड्या आहेत.
-
हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. (फोटो – इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख