-
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबरच ‘पंचक’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘पंचक’ या तेजश्रीच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
‘पंचक’ या चित्रपटाच्यानिमित्ताने तेजश्री विविध ठिकाणी मुलाखत देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
नुकतीच तिने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने फिटनेस फंडा सांगितला. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
तेजश्री म्हणाली, “प्लीज एक रुपया देखील जीममध्ये घालवू नका. कारण तुम्ही तुमचे पैसे वाया घालवत आहात.” (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
“आताच्या काळात मानसिक आरोग्य हा जास्त दुर्लक्ष केला जाणारा विषय मला वाटतोय. त्यामुळे आरोग्याचा विचार करत असाल तर सगळ्या आधी मानसिकदृष्ट्या मजबूत व्हा. त्याच्यानंतर बाकी सगळं नीट होतं. याच्यासाठी सकाळचं धावणं खूप महत्त्वाचं असतं.” असं तेजश्री म्हणाली. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
पुढे तेजश्री म्हणाली, “अजिबात योगा मॅट, जीम, शूज, महागडे कपडे याची थेरच नको. मोबाइल घरात ठेवा सगळ्यात आधी आणि कुठे तरी वाऱ्याचा आवाज ऐका.” (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
“मला वाटतं, तेवढी सकाळची अर्ध्यातासाची वेळ असते. जेव्हा मला माझा स्वतःचा आवाज फार स्पष्ट ऐकू येतो. बाकींच्या आवाजाशिवाय. त्यामुळे शांतपणे बाहेर जा,” असं तेजश्री म्हणाली. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
“वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने धावा. कारण ती गोष्ट खूप छान असते. तुम्हाला कळणार पण नाही तुमचा अप्रोच कसा बदलत चालला आहे. त्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागणार नाही,” असं तेजश्री म्हणाली.(फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
पुढे अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला सांगतील, तुमचं बोलणं बदललंय, तुम्ही फ्रेश वाटताय. यासाठी काही वेगळं काम करावं लागत नाही. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
“काही बेसिक गोष्टीचे नियम आपल्या आयुष्यात आणले पाहिजे. म्हणजे आयुष्य सोप होत,” असं तेजश्रीने सांगितलं. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
“मग पार्टी करा, सगळं करा. खाल्ल्या अन्नाला जागतो तसं मी खालेल्या अन्नाला धावत जा म्हणीन,” असं तेजश्री म्हणाली. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”