-
आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर १० जानेवारीला आयरा-नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. (फोटो सौजन्य – नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)
-
उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर १३ जानेवारीला आयरा-नुपूरच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या बॉलरूममध्ये आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी झाली. (फोटो सौजन्य – नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)
-
आयरा-नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत राजकीय नेतेमंडळीसह बॉलीवूड सेलिब्रिटी आणि मराठी कलाकार सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसेप्शन पार्टीला हजेरी लावून आयरा-नुपूरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. (फोटो सौजन्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्टाग्राम)
-
या पार्टीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळाल्या. (फोटो सौजन्य – विरल भयानी इन्स्टाग्राम)
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह उपस्थित लावली होती. (फोटो सौजन्य – मानव मंगलानी इन्स्टाग्राम)
-
तसेच आदित्य ठाकरे यांनी आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे यांच्याबरोबर हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य – विरल भयानी इन्स्टाग्राम)
-
शिवाय काँग्रेस आमदार धीरज देशमुख पत्नी दीपशिखा देशमुखसह रिसेप्शन पार्टीला उपस्थित होते. यावेळी दोघं खूप सुंदर दिसत होते. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)
-
महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणजे रितेश व जिनीलीया देशमुख देखील आमिर लेकीच्या रिप्सेशनमध्ये सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य – विरल भयानी इन्स्टाग्राम)
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही आयरा-नुपूरला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)
-
रिसेप्शनपार्टीला धकधक गर्ल माधुरी दीक्षित हटके अंदाजात दिसली. तिच्यासह पती श्रीराम नेने देखील हजर होते. (फोटो सौजन्य – विरल भयानी इन्स्टाग्राम)
-
अभिनेते सुनील बर्वे यांनी पत्नी आणि मुलांसह आयरा-नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य – सुनील बर्वे इन्स्टाग्राम)
-
सुनील बर्वे यांनी रिसेप्शन पार्टीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – सुनील बर्वे इन्स्टाग्राम)
-
याशिवाय महाराष्ट्राचे लाडके आर्ची-परश्या अर्थात रिंकू राजगुरू व आकाश ठोसर देखील आयरा-नुपूरला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. तसेच अतुल कुलकर्णी देखील पत्नी गितांजली कुलकर्णी यांच्याबरोबर पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य – रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”