-
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची चिमुकली मालती मेरी दोन वर्षांची झाली आहे. (Photo: Priyanka Chopra)
-
आपल्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त प्रियांका आणि निकने एक लहानशा पार्टीचे आयोजन केले होते. (Photo: Priyanka Chopra)
-
या पार्टीतील काही फोटो निक जोनासने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo: Priyanka Chopra)
-
या पार्टीसाठी एल्मो-थीम ठेवण्यात आली होती, तर मालतीने यावेळी गुलाबी रंगाचा ड्रेस आणि गुलाबी मुकुटासारखा हेडबॅन्ड घातला होता. इतकंच नाही तर तिने हार्ट-शेपचा गॉगलही घातला. होता. (Photo: Nick Jonas)
-
प्रियांका आणि निकने भगव्या आणि लाल रंगाचे कपडे परिधान केले होते. यावेळी या दोघांनीही खूप गोड फोटो काढले आहेत. (Photo: Nick Jonas)
-
मालतीसाठी खास एल्मो थीमचा केक तयार करण्यात आला होता. पार्टीमध्ये असलेल्या बॅनरवर ‘मालतीचे जग (Malti’s world)’ असे लिहिले होते. (Photo: Nick Jonas)
-
जो जोनास, फ्रँकी जोनास , जॉन लॉयड टेलर, कॅव्हानॉफ जेम्स आणि ग्रेग गार्बोव्स्की इत्यादी मित्रपरिवार आणि कुटुंबीय या पार्टीला उपस्थित होते. (Photo: Nick Jonas)
-
मालतीच्या या गोंडस फोटोंसाठी निकने सुंदर कॅप्शन लिहिलं होतं. त्याने म्हटलंय, “आमची लहानशी परी दोन वर्षांची झाली.” (Photo: Nick Jonas)
-
यावेळी प्रियांकाने आपली आई मधू चोप्रासह वेगवेगळ्या पोजमध्ये पोलारॉईड फोटो काढले आहेत. (Photo: Anjula Acharia)
-
हे फोटो प्रियांकाची मॅनेजर अंजुलाने पोस्ट केले असून निक आणि प्रियांकाच्या वेगवेगळ्या फॅनपेजवर या पार्टीमधील फोटो शेअर करण्यात आले आहेत. (Photo: Anjula Acharia)
-
दरम्यान, निक आणि प्रियांकाच्या चाहत्यांनी मालतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून कमेंट्सच्या रूपात त्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo: Priyanka Chopra)
-
एका चाहत्याने कमेंटमध्ये म्हटलंय, “लाल रंगाच्या पेहरावात एक सुंदर कुटुंब. किती गोड!” तर दुसऱ्याने म्हटलंय, “या सुंदर कुटुंबाला खूप खूप प्रेम, आनंद आणि आदर.” (Photo: Nick Jonas)
-
काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि निकने लॉस एंजेल्स येथील समुद्रकिनारी मालतीच्या वाढदिवसानिमित्त अतिशय लहानसे सेलिब्रेशन केले होते. (Photo: Priyanka Chopra)
-
यावेळी प्रियांका आणि निक मालतीसह बीचवर मजामस्ती करताना दिसले. (Photo: Priyanka Chopra)
-
दरम्यान, मालतीच्या वाढदिवसाचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. (Photo: Nick Jonas)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य